1 / 8बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतात. यात अनेकदा त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या चर्चा रंगतात. त्यामुळे ब्रेकअप, पॅचअप, घटस्फोट या चर्चा चाहत्यांसाठी नवीन नाहीत. मात्र, तरीदेखील सध्या सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची2 / 8करीना कपूरसोबत लग्न करणाऱ्या सैफ अली खानचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झालं होतं. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुलंदेखील आहेत.3 / 8१९९१ मध्ये वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या अमृतासोबत सैफने लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.4 / 8लग्नाच्या १३ वर्षानंतर या दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर आजही या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. 5 / 8सध्या सोशल मीडियावर सैफची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने अमृतापासून विभक्त होण्याचं कारण सांगितलं आहे.6 / 8विशेष म्हणजे अमृताचं लग्नानंतर बदलेलं वागणं सैफला पसंत नव्हतं. ती सतत त्याच्यासह त्याच्या आई-बहिणींचा अपमान करायची असं, सैफने सांगितलं होतं.7 / 8'लग्नाच्या काही वर्षांनंतर अमृताचं कुटुंबासोबतच असलेलं वागणं बदललं होतं. ती सतत आई आणि सबा, सोहा यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागायची. सतत त्यांचा अपमान करायची. इतकंच नाही तर ती त्यांचा पाणउताराही करायची', असं सैफने सांगितलं.8 / 8पुढे तो म्हणतो, 'अमृता सतत मला टोमणे मारायची. मी एक वाईट नवरा, वडील असल्याचं भासवायची. या गोष्टींना कंटाळून मी अमृतापासून घटस्फोट घेतला.' दरम्यान, सैफ आणि अमृता विभक्त झाल्यानंतर सैफने करीना कपूरसोबत लग्न केलं. आज या दोघांना तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलं